एआय कौशल्य वर्ग मोफत सुरू
४ फेब्रुवारी २०२६
माहिती आणि प्रसारण मंत्रालय एआय कौशल्य कार्यक्रमाच्या प्रीमियम अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देत आहे.
मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्राच्या जलद वाढीला सहकार्य देण्यासाठी देशभरात कौशल्य विकास उपक्रमांचे प्रमाण वाढविण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय सक्रियपणे काम करते. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट २०२५ मधील भागीदारींवर आधारित मंत्रालयाने देशव्यापी एआय कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी गुगल/यूट्यूब सोबत सहयोग केला आहे.
या सहकार्याअंतर्गत उमेदवारांना प्रीमियम अभ्यासक्रम मोफत उपलब्ध केले आहेत. अभ्यासक्रमाची रचना दोन प्रमुख मार्गांद्वारे रोजगारक्षमता आणि उद्योग तयारी वाढविण्यासाठी केली आहे, ते म्हणजे फाउंडेशन एआय आणि प्रॉम्प्टिंग. सहभागी उमेदवार सर्जनशील कल्पना, कथाकथन आणि सामग्री विकासासाठी जनरेटिव्ह एआय टूल्सचा वापर करायला शिकतील.
या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण भारतातील निर्माते, विकासक आणि मीडिया व्यावसायिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेतील उच्च-गुणवत्तेच्या प्रशिक्षणाची उपलब्धता लोकशाहीकरण करणे आहे. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेची चैतन्यशीलता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. म्हणूनच, या कार्यक्रमाचे फायदे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील मीडिया व्यावसायिकांना मिळतात.
फाऊंडेशनल अभ्यासक्रम (फेज १) पूर्ण केल्याने दुसऱ्या टप्प्यात जाण्याचे मार्ग मोकळे होतील जिथे सहभागींना व्हर्टेक्स एआय, जेमिनी आणि गुगल क्लाउड सारख्या प्रगत साधनांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल जे विशेषतः मीडिया वर्कफ्लोसाठी तयार केले आहेत.
इच्छुक उमेदवार https://aiskillhouse.iict.org/ व्दारे अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकतात.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१०५

