गोवा विध्यापिठाच्या पद्व्युत्तर आणि बी.एड अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश रॅंकिंग परीक्षा
५ फेब्रुवारी २०२६
गोवा विध्यापिठाने विध्यापिठाच्या आवारात आणि विध्यापिठाशी संलग्न असलेलेया महाविध्यालयामध्ये शिकविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि बी.एड अभ्यासक्रम शालेय वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी गोवा विध्यापिठ प्रवेश रॅंकिंग परीक्षा २०२६-२७ जाहीर केली आहे. गोवा विध्यापिठाच्या समर्थ प्रवेश पोर्टलव्दारे ४ ते १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारतील. जीयु-ए-आरटी-१-७ मार्च, ८ मार्च, १४ मार्च, १५ मार्च आणि २२ मार्च २०२६ रोजी घेण्यात येईल. तर शिक्षण शाखा बदलाची परिक्षा २५ आणि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येईल. पीजी आणि बी.एड. अभ्यासक्रम प्रवेश जीयु-ए-आरटी परीक्षेच्या आधारावर असेल.
अंतिम वर्षाचे अंडरग्रॅज्युएट विध्यार्थीही अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्रता पूर्ण करण्याच्या अटीवर तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी https://unigoaadmission.samarth.edu.in/2026 या पोर्टलवर भेट देऊन १८ फेब्रुवारी २०२६, संध्या ५.०० वाजेपर्यंत अर्ज करावे. अर्ज भरण्यास कोणतीही अडचण असल्यास https://forms.gle/GPV6XDhDA9btY4wj6 वर भेट द्यावी.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१०९

