माहिती आणि प्रसिध्दी खाते२ फेब्रुवारी रोजी जीएमसी संलग्न तुये सरकारी रुग्णालयाचे उद्घाटन होणारमाहिती आणि प्रसिध्दी खाते
३१ जानेवारी २०२६
२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तुये येथील सरकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र (जीएमसी लिंक) चे उद्घाटन होईल.
आरोग्य मंत्री श्री. विश्वजित राणे, आमदार श्री मायकल लोबो, श्री जीत आरोलकर, श्री प्रविण आर्लेकर, जिल्हा पंचायत सदस्य श्री. श्रीकृष्ण हरमलकर, सरपंच, श्रीमती. अनिता साळगावकर आणि जीएसआयडीसी लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री रोहित कदम यावेळी उपस्थित राहणार आहेत.
जीएसआयडीसीने बांधलेल्या या नवीन रुग्णालयाची किंमत ८५ कोटी रुपये आहे. नवीन रुग्णालयाच्या इमारतीमध्ये १०० खाटांची क्षमता आहे.
मा /वाप/ दिबा/ एपी/ र ना/ २०२६

