राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना राम नवमीच्या शुभेच्छा
५ एप्रिल २०२५
गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्या व्यक्त केल्या आहेत
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, राम नवमीच्या शुभप्रसंगी मी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. राम नवमी हा अविस्मरणीय दिवस म्हणजे या दिवशी श्रीरामाचा जन्म झाला होता. भगवान श्रीराम हे धर्माचे मूर्त स्वरूप आणि विष्णूचे अवतार म्हणून पूजनीय आहेत. कर्तव्यनिष्ठ आणि एक आदर्श पुत्र, पती आणि राजा म्हणून या त्यांच्या गुणांसाठी ते ओळखले जातात”. राज्यपाल पुढे म्हणतात, भगवान श्रीरामाने आपल्याला सत्य आणि न्यायासाठी समर्पित राहण्याचे, गरजेच्या वेळी शौर्य आणि धाडस आणि जय आणि पराभवात नम्र राहण्याची शिकवण दिली.
रामनवमीच्या शुभ प्रसंगी, मी गोव्यातील सर्व लोकांना भगवान श्रीरामाच्या उदात्त तत्त्वांचे आचरण करण्याचे आणि अधिक सलोखा, सद्भावना, सामाजिक एकता आणि सामुदायिक प्रगतीसाठी स्वतःला पुन्हा समर्पित करण्याचे आवाहन करतो.
रामनवमीचा हा सण आपण सर्वांना आनंद, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो अशी आशा मी व्यक्त करतो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/ वाप/दिबा/ एपी/ र ना/ २०२५/