प्रसिद्धी पत्रक
गोवा सरकारने स्थापन केलेल्या गोवा कोंकणी अकदमीची कचेरी आणि मोसिंन्योर दाल्गाद ग्रंथालय स्तलांतरित होत असून नूतन वास्तूचा उद्धाटन सोहळा बुधवार ता. 21 जून २०२३ रोजी सकाळी 10 वाजता गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
१९८६ साली स्थापन झालेली गोवा कोंकणी अकादमी गेल्या १९ वर्षांपासून पाटो पणजी येथील एका जीर्ण सरकारी वास्तूत कार्यरत होती. ही वास्तू धोकादायक बनल्याने अकादमीचे स्थलांतर होणे आवश्यक होते. गोवा सरकारनेही अडचण समजून घेउन पाटो प्लाझा येथील गोवा संचार भवन (( बी.एस.एन.एल.) इमारतीच्या पाचव्या मजल्यावर अकादमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यीक श्री. दामोदर मावजो यांचासत्कार तसेच माधव बोरकार यांनी लिहिलेल्या स्वर्गीय डॉ. मनोहरराय सरदेसाययांच्यावरील जीवन चरित्र पुस्तीकेचें लोकार्पणहोणार आहे.
ह्याउद्घाटन सोहळ्याचेसन्माननीय अतिथी म्हणून सरस्वती सन्मान पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यीक श्री महाबळेश्वर सैल तसेचविशेष अतिथी म्हणून राजभाशा सचिव श्री सरप्रीत सिंग गिल आणि राजभाशा संचालक राजू गांवस हजर असतील.
ह्या उदघाटन सोहळ्यास सर्व हितचिंतकानी आवर्जून हजर राहावे अशी विनंती गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष श्री अरुण साखरदांडे आणि सचिव मेघना शेटगांवकर यांनी केली आहे.