गोठा सजावट स्पर्धेचे आयोजन
१ डिसेंबर २०२५
कला आणि संस्कृती संचालनालयाने नाताळाच्या काळात २६ ते २ जानेवारी पर्यंत गोठा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा संस्था आणि वैयक्तिक व घरगुती पातळीवर घेण्यात येणार आहे.
वैयक्तिक व घरगुती पातळीवर पहिले बक्षिस २५ हजार रूपये, दुसरे बक्षिस २० हजार रूपये आणि तिसरे बक्षिस १५००० हजार रूपये, चौथे १२००० हजार रूपये, पाचवे १०,००० हजार रूपये देण्यात येईल. तर ७ हजार रूपयांची पांच उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
संस्था पातळीवर पहिले बक्षिस ४० हजार रूपये आणि प्रमाणपत्र, दुसरे ३५ हजाराचे बक्षिस आणि प्रमाणपत्र, तिसरे ३० हजार रूपये आणि चौथे २५,००० हजार रूपये, पाचवे २०,००० हजार रूपये देण्यात येईल. तर १५ हजार रूपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
इच्छुक व्यक्तींनी तसेच संस्थानी अर्ज नमुने कला व संस्कृती संचालनालय, पाटो पणजी, रविंद्र भवन काणकोण, रविंद्र भवन मडगांव, रविंद्र भवन कुडचडे, रविंद्र भवन बायणा वास्को, रविंद्र भवन सांखळी, राजीव कला मंदिर फोंडा यांच्या कार्यालयातून मिळवावे. पूर्ण भरलेले अर्ज १८ डिसेंबर पूर्वी वरील कार्यालयात सादर करावे. उशीरा पोचलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८३०

