casibom giriş

राज्यपालांकडून गोव्यातील शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

४ सप्टेंबर २०२५

गोव्याचे राज्यपाल श्री पी अशोक गजपती राजू यांनी आपल्या समाजाचे भविष्य घडविण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या गोव्यातील संपूर्ण शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या या महत्त्वाच्या प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. प्रख्यात तत्वज्ञानी आणि राजकारणी असलेले डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करतात. शिक्षणाच्या माध्यमातून समाज निर्माण करण्याचे हे त्यांचे स्वप्न महत्वाचे आहे.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, शिक्षक हे खरे राष्ट्र निर्माते आहेत ते केवळ ज्ञानच देत नाहीत तर ते आपल्या विध्यांर्थ्यांमध्ये मुल्ये रूजवितात, कुतूहल निर्माण करतात आणि आपल्या विध्यांंर्थ्यांचे चारित्र्य जोपासतात. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात त्यांची भुमिका खूप महत्वाची असून ते तरूणांना नवोपक्रम स्वीकारण्यास, नैतिक मुल्यांचे पालन करण्यास आणि जबाबदार नागरिक बनण्यास मार्गदर्शन करतात. भारत २०४७ च्या विकसीत भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करीत असताना कुशल दयाळू आणि भविष्यासाठी तयार असलेली पिढी निर्माण करण्यात शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान ठरते. विकसीत राष्ट्राचा पाया त्यांच्या शिक्षण व्यवस्थेच्या बळावर आणि शिक्षकांच्या समर्पणावर अवलंबून असतो.

शिक्षकांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि तरुण मनांना घडविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक करताना राज्यपाल म्हणतात, तुमचे कार्य येणाऱ्या पिढीला ज्ञान आणि सक्षम बनवित राहो. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मा/वाप/दिबां/एपी/रना/ २०२५/६२९

Skip to content