जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त खास मुलाखत
जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त ७ जून २०२२ रोजी माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका श्रीमती ज्योती सरदेसाई यांची गोवा दूरदर्शन व आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ. एम. आणि म्हादई वाहिनीवरून मुलाखत प्रसारित होणार आहे.
सर्वसामान्यांच्या जीवनात अन्न सुरक्षेचे महत्व आणि त्या दृष्टिकोनातून अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यपद्धती चे सखोल विवेचन या मुलाखतीद्वारे करण्यात आलेले आहे.
७ जून रोजी गोवा दुरदर्शनवरून संध्याकाळी ४.३० वा. मुलाखत प्रसारित होणार आहे. तर आकाशवाणीच्या एफ. एम. रेनबो वर सकाळी ७.४५ वाजता ‘नमस्कार गोवा’ या कार्यक्रमात आणि म्हादई वाहिनीवरून ‘गोंयचो परमळ’ या कार्यक्रमात संध्याकाळी ६.३५ वाजता प्रसारित करण्यात येईल.
माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सहाय्यक महिती अधिकारी श्री. श्याम गावकर यांनी सदर मुलाखत घेतली आहे.