Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

ग्रामपंचायत सचिव पदांसाठी २८ रोजी लेखी परीक्षा

तारीख : २६ फेब्रुवारी २०२१

पंचायत सचिव पदांसाठी रविवार दि. २८ फेब्रुवारी २०२१ सकाळी १०.०० ते ११.३० पर्यंत उत्तर गोव्यातील खालील परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात येतील.

१. सरकारी पॉलीटेक्निक, पणजी

२. डॉन बॉस्को हायस्कूल, पणजी

३. सेंट मायकल हायस्कूल, ताळगाव

४. रोझरी हायस्कूल, कुजिरा, बांबोळी

५. के. आर. हेडगेवार, कुजिरा, बांबोळी

६. मुष्टीफंड हायस्कूल कुजिरा, बांबोळी

उमेदवारांना या परीक्षेसंदर्भात पत्रे पाठविण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांना अजून पत्रे मिळालेली नाहीत त्यांनी दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.०० ते १.०० आणि २.३० ते ५.०० यावेळेत ऑनलाईन अर्जाच्या पोचपावती प्रतीसह पंचायत संचालनालयाच्या कार्यालयातून आपली पत्रे घेऊन जावीत.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

Skip to content