शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी

तारीख : २४ फेब्रुवारी २०२१

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकार्‍यांनी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उत्तर गोव्यातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, चौकांवर, धंद्याच्या ठिकाणी, गल्लीबोळात किंवा कोणत्याही खुल्या जागेत सर्व प्रकारची शस्त्रे, अग्नीशस्त्रे, दारूगोळा, प्राणघातक शस्त्रास्त्रे इत्यादींचा वापर करण्यावर तात्काळ बंदी घातली आहे.

सर्व शस्त्र परवाना धारकांनी दि. १ मार्च २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांची शस्त्रे त्यांच्या कार्यक्षेत्रातील जवळच्या पोलीस स्थानकांवर जमा करावी असे आदेश देण्यात आले आहेत. परवाना धारकांना त्यांची जमा केलेली सर्व शस्त्रास्त्रे मतमोजणीनंतर पाच दिवसांनी म्हणजेच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत केली जातील.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२११

Skip to content