जिल्हास्तरीय देखरेख समितीचा मानसिक आरोग्य सहाय्याच्या महत्त्वावर पुनरुच्चार, सर्व संबंधितांना संवेदनशीलतेने आणि संयमाने वागण्याचे आवाहन.
१३ मे २०२६
बिट्स पिलानी, केके बिर्ला गोवा कॅम्पस येथील अलीकडील विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय देखरेख समितीने , कॅम्पसमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थात्मक परिसंस्था, विद्यार्थी सहाय्यता यंत्रणा आणि मानसिक आरोग्य प्रतिसाद आराखड्याचे सविस्तर मूल्यांकन करून आपला अहवाल २ फेब्रुवारी, २०२६ रोजी सरकारला सादर केला आहे.
सदर समितीने आत्महत्या हा एक गुंतागुंतीचा आणि बहुआयामी मुद्दा असून तो अनेक मानसिक, भावनिक, सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांनी प्रभावित असतो असे निरीक्षण नोंदवले आहे. तथापि, हितधारकांशी झालेल्या संवादातून आणि प्राथमिक निरीक्षणातून, तातडीने बळकटीकरण आवश्यक आहे
समितीने अत्यंत स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाचा भार, कामगिरीच्या अपेक्षा, सामाजिक एकाकीपणा, भावनिक असुरक्षितता, झोपेतील व्यत्यय, वैयक्तिक समस्या आणि वेळेवर मानसिक आरोग्य सहाय्य मिळवण्यातील अडचणी यांमुळे मोठ्या तणावाचा अनुभव येऊ शकतो असे नमुद केले. पुढे असेही निदर्शनास आले की, संस्थेमध्ये सध्या समुपदेशन आणि समवयस्क-आधार यंत्रणा अस्तित्वात असल्या तरी, समुपदेशन क्षमता, प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम, प्राध्यापकांची संवेदनशीलता, विद्यार्थी सहभाग प्रणाली आणि उपलब्ध मानसिक आरोग्य संसाधनांविषयी जागरूकता यामध्ये भरीव विस्ताराची गरज आहे.
२४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीदरम्यान, बिट्स पिलानी, केके बिर्ला गोवा कॅम्पसच्या डीनने समितीला जिल्हास्तरीय देखरेख समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली आहे अशी माहिती दिली. संस्थेने मानसिक आरोग्य व्यावसायिकांची संख्या वाढवून आपली मानसिक आरोग्य सहाय्यता प्रणाली अधिक सक्षम केली असून विद्यार्थ्यांसाठी २४×७ मानसिक आरोग्य सहाय्यता सुविधा स्थापन केली आहे अशीही माहिती दिली.
समितीने पुढे नमूद केले की, सुरू असलेल्या मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्यविषयक जनजागृती उपक्रमांचा एक भाग म्हणून आरोग्य सेवा संचालनालयामार्फत १० एप्रिल २०२६ रोजी कॅम्पसमध्ये एक वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते . याव्यतिरिक्त, डॉ. विठोबा मळकर यांच्यामार्फत मानसिक स्वास्थ्य, तणाव व्यवस्थापन, भावनिक लवचिकता आणि वेळेवर व्यावसायिक मदत घेण्याचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित करून विविध जनजागृती आणि समुपदेशन सत्रे आयोजित करण्यात आली होती .
या संदर्भात, समितीने शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, सोशल मीडिया वापरकर्ते आणि माध्यम संस्थांसह सर्व संबंधितांकडून जबाबदार संवाद पद्धतींच्या महत्त्वावर भर दिला आहे. समितीने विशेषतः, सनसनाटी मथळे, अटकळींवर आधारित वृत्तांकन, आत्महत्येच्या पद्धती किंवा ठिकाणांचा खुलासा, वैयक्तिक माहितीचा प्रसार आणि कारणांचे अतिसरलीकरण टाळणे यासह, आत्महत्येच्या वृत्तांकनासंदर्भात भारतीय प्रेस परिषदेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
मानसिक आरोग्यासाठीचा आधार आणि मदत मागण्याच्या वर्तनाला कोणताही कलंक न लावता सामान्य मानले पाहिजे आणि त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. तणाव, चिंता, भावनिक त्रास किंवा मानसिक अडचणी अनुभवणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध समुपदेशन सेवा, विश्वासू प्राध्यापक, समवयस्क, कुटुंबीय किंवा व्यावसायिक मानसिक आरोग्य तज्ञांकडून मदत घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासन सर्व संबंधितांना आवाहन करते की, असुरक्षित विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित, आश्वासक व मानसिकदृष्ट्या सुरक्षित शैक्षणिक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी संवेदनशीलतेने, संयमाने आणि जबाबदारीने वागावे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३१८
