गोवा-आयपीबी तर्फे नव्या वेबिनार सिरीजचा शुभारंभ
तारीख : ११ फेब्रुवारी २०२१
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळ (गोवा-आयपीबी) २०२० वर्षासाठी व्यवसाय मुल्यांकन करण्याच्या सुसूत्रतेमध्ये गोव्याचे मानंकन सुधारण्यासाठी बिझीनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन(बीआरएपी) २०२०ची अंमलबजावणी करणार आहे. व्यवसायामध्ये सहजता आणण्यासाठी या नवीन वेबिनार मालिकेचा शुभारंभ केल्याचे मंडळाने सांगितले.
गोवा-आयपीबीच्या https://www.goaipb.goa.gov. in या वेबसाईटवर या वेबिनारचा कार्यक्रम उपलब्ध आहे. एप्रिल २०२१ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी अशा एकूण ११ वेबिनारची आखणी करण्यात आली आहे. प्रत्येक खाते त्याच्या ठराविक वेळेत सहभागींच्या सेवांबद्दलच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करेल.
या सेवांचा उपयोग करणारे नागरीक आणि व्यावसायिक वापरकर्ते यांनी राज्याने हाती घेतलेल्या सुधारणांविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी आपल्या सोईनुसार या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे आणि तुमच्या अभिप्राय थेट सरकारला कळवावा.
असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१६३