लोकसेवेचे नवीन आधार अॅप राष्ट्राला समर्पित
२९ जानेवारी २०२६
वाणिज्य आणि उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज नवीन आधार अॅप राष्ट्राला समर्पित केले, जे लोकांना ओळख पडताळणीच्या सोयीचे आणि सुलभ आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे विकसित केलेले, आधार अॅप हे पुढील पिढीचे मोबाइल अॅप्लिकेशन आहे जे आधार क्रमांक धारकांना त्यांची डिजिटल ओळख पटविण्यासाठी एक सुरक्षित, सोयीस्कर आणि गोपनीयतेला प्राधान्य देणारा मार्ग आहे.
नवीन अॅपचे अनावरण केल्यानंतर, श्री. प्रसाद यांनी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या या प्रशंसनीय कार्याबद्दल अभिनंदन केले आणि आधार हे सरकारसाठी डिजिटल प्रशासनाचे एक उदाहरण असल्याचे सांगितले. ते म्हणाले की युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया सेवा वितरणाला सुलभ करते आणि नवीन अॅप प्रक्रियेला आणखी गती मिळेल.
भारताच्या पातळीवर, डिजिटल ओळख प्रणाली ही केवळ तांत्रिक सुविधा नाही तर ती सार्वजनिक विश्वास, सुशासन आणि नागरिकांच्या सक्षमीकरणाची बाब आहे. नवीन आधार अॅप नागरिकांच्या हातात नियंत्रण, संमती आणि सुविधा देऊन या तत्त्वांना मूर्त रूप देते.
आपल्या भाषणात, MeitY चे सचिव एस कृष्णन यांनी नवीन अॅप डेटा कमीत कमी करण्यास आणि सुरक्षिततेत वाढ करण्यास प्रोत्साहन देईल आणि आधार क्रमांक धारकांद्वारे माहितीच्या निवडक शेअरिंगला प्रोत्साहन देईल. वापरास सुलभ असलेले हे आधार अॅप ऑफलाइन व्हेरिफिकेशन सीकिंग एंटिटी क्यआर कोड स्कॅनिंगद्वारे हॉटेल चेक-इन, चेहरा पडताळणी, सिनेमा तिकीट बुकिंगसाठी वय पडताळणी, अभ्यागत आणि परिचारिकांसाठी रुग्णालयात प्रवेश, गिग कामगार आणि सेवा भागीदारांची पडताळणी अशा अनेक वापरासाठी उपयोगी आहे.
पुराव्यासाठी फेस व्हेरिफिकेशन, एका क्लिकमध्ये बायोमेट्रिक लॉक/अनलॉक, ऑथेंटिकेशन हिस्ट्री पाहणे आणि संपर्क तपशील सहज शेअर करण्यासाठी QR-आधारित कॉन्टॅक्ट कार्ड यासारख्या प्रगत कार्यक्षमतांचा अॅपमध्ये समावेश आहे.
यूआयडीएआयचे अध्यक्ष श्री. नीलकंठ मिश्रा, यूआयडीएआयचे सीईओ श्री भुवनेश कुमार यांनी अॅपचे वैशिष्ट्य सांगितले.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/८४

