गोवा विद्यापीठात बहुभाषिक कवी समेंलन
२९ जानेवारी २०२६
मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ताळगांव पठार येथील गोवा विद्यापीठाच्या परिषदगृहात ब्लॉक-बी येथे राष्ट्रीय पातळीवरील “बहुभाषिक कवी संमेलन” आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन गोवा विद्यापीठाचे निबंधक डॉ. सुंदर धुरी यांच्याहस्ते होणार. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे हे सन्माननीय पाहुणे असतील. कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष श्री दिलीप बोरकर आणि मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव अशोक परब यावेळी उपस्थित राहतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/८२

