छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा आणि नाट्यप्रवेश स्पर्धा

तारीख : १० फेब्रुवारी २०२१
माघ २१, १९४२

राज्यपातळीवरील छत्रपती शिवाजी महाराज जयंती समारोहाचा एक भाग म्हणून माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे दि. १९ फेब्रिवारी २०२१ रोजी फर्मागुडी फोंडा गोवा येथे अखिल गोवा आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा तसेच माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल गोवा नाट्यप्रवेश स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि महाराजांचे जीवन व कार्य (१६२७ ते १६८०) यांवर भर देणे हा या स्पर्धेचा विषय असेल. ही स्पर्धा सकाळी ९.०० वाजल्यापासून फर्मागुडी येथील गणपती मंदिराच्या आवारात घेतली जाईल.

आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषेच्या विजेत्यांना रू. १०,०००/-, रू. ७०००/- आणि रू. ५०००/- अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीसे देण्यात येतील. त्याशिवाय प्रत्येकी रू. १०००/- ची दोन उत्तेजनार्थ बक्षीसे असतील.

नाट्यप्रवेश स्पर्धेतील विजेत्यांना रू. १०,०००/-, रू. ७०००/- आणि रू. ५०००/- अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीसे देण्यात येतील. तसेच स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रे देण्यात येतील.

या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणार्‍या संस्थांनी १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपल्या प्रवेशिका माहिती आणि प्रसिद्धी खात्याकडे कामकाजाच्या वेळेत सादर कराव्या असे खात्यातर्फे कळविण्यात येत आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१६१

Skip to content