latest EventsLatest NewsMarathi Press ReleasePress Releases

नवी दिल्लीतील भारत पर्व येथे गोव्याचा चित्ररथ

२७ जानेवारी २०२६

भारताच्या सांस्कृतिक, कलात्मक, पाककृती आणि आध्यात्मिक वारशाचा एक प्रमुख वार्षिक कार्यक्रम असलेल्या भारत पर्व २०२६ मध्ये “स्वतंत्रता का मंत्र – वंदे मातरम्” या संकल्पनेवर गोवा राज्याचा चित्ररथ सादर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने भारत पर्वचे आयोजन केले होते. भारत पर्व उत्सव ३१ जानेवारी २०२६ पर्यंत नवी दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर जनतेसाठी खुले राहील.

केंद्रिय संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात २०२४-२०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी राज्य, संघप्रदेशांचे चित्ररथ निवड करण्याची प्रक्रिया आणि नियमांच्या सामंजस्य करारानुसार यावर्षी भारत पर्व येथे हा चित्ररथ सादर केला. गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये त्याच सामंजस्य करारानुसार कर्तव्य पथावर चित्ररथ सादर करण्यात आला.

विविधतेत एकता या भारताच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यासाठी भारत पर्व उत्सावाचे आयोजन केले आहे. निर्माण करतो आणि देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करतो. या देशभक्तीच्या उत्सवातून देशाच्या समृध्द आणि विविधतेच्या संस्कृतीचे दर्शन घडते.

गोव्यातील फोंडा येथील प्रसिद्ध कलाकार श्री सुशांत खेडेकर यांनी तयार केलेला चित्ररथ नवी दिल्लीत देशाच्या राजधानीत आयोजित भारत पर्व उत्सवात प्रदर्शित केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय निवड समितीने हा चित्ररथ निवडला. गोवा मुक्ती चळवळ, सत्याग्रहींचे योगदान, ऐतिहासिक आग्वाद तुरूंगवासाची प्रतिमा, अशोक स्तंभ, भारत मातेची प्रतिमा आणि गोवा मुक्ती चळवळीत महत्वाची भुमिका असलेले डॉ राम मनोहर लोहिया यांची प्रतिमा चित्ररथाव्दारे प्रदर्सित केली. त्याचप्रमामे घोडेमोडणी, पारंपारिक लोकनृत्य आणि इतर वारश्याचे दर्शन घडते.

गोव्याचा चित्ररथ तयार करण्याचे काम नवी दिल्लीत राष्ट्रीय रंगशाळा शिबीरात झाले. श्री सुशांत खेडेकर यांच्या देखरेखीखाली कलाकारानी चित्ररथ तयार करण्याचे काम केले. चित्ररथास डॉ साईश देशपांडे यांचे संगीत लाभले. वेशभूषा संगीता खेडेकर तर लोकनृत्याची जबाबदारी दिनेश प्रियोळकर यांनी सांभाळली.

या चित्ररथा व्यतिरिक्त, राज्याने पर्यटनाशी संबंधित माहिती अधोरेखित करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन खात्याच्या अंतर्गत गोव्याच्या पाककृतींचे प्रदर्शन करणारा एक खाद्यपदार्थ स्टॉलही उभारला आहे ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर गोव्याचा प्रचार केला जाईल.

हे लक्षात घ्यावे की २०१६ पासून प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून राष्ट्रीय राजधानीत भारत पर्व आयोजित केले जात आहे. या कार्यक्रमात अन्न महोत्सव, हस्तकला मेळा, लोक आणि आदिवासी नृत्य सादरीकरणे, सांस्कृतिक पथकांचे सादरीकरण आणि लाल किल्ल्याची रोषणाई यांचा समावेश आहे.

माहिती व प्रसिध्दी खात्यातर्फे भारत पर्व उत्सवात गोव्याचा चित्ररथ प्रदर्शित केला.

Skip to content