Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

नाणूस येथे राणे बंडाचे स्मरण

२६ जानेवारी २०२६

सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार डॉ द्विया राणे यांनी राणे बंडाच्या स्मारकावर पुष्पचक३ वाहून राणे बंडाच्या स्मरणार्थ आदरांजली वाहिली. १८५२ मध्ये पोर्तुगीज राजवटीविरुद्ध झालेल्या मोठ्या बंडाच्या स्मरणार्थ आणि आणि २६ जानेवारी १८५२ रोजी किल्ला ताब्यात घेण्यात आला.
डॉ. देविया राणे यांनी ऐतिहासिक राणे बंडाच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण केला.

याप्रसंगी बोलताना डॉ द्विया राणे यांनी

आज आपण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करताना गोव्याच्या मुक्तीनंतर त्याग आणि बलिदान दिलेल्या दीपाजी राणे यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे आपण स्मरण करूया. नाणुज किल्ला आणि राणे बंडाचे स्मारक यासारख्या ऐतिहासिक स्थळांचे आपल्या भावी पिढीसाठी जतन करणे महत्वाचे आहे असे डॉ. देविया राणे यांनी सांगितले.

उपजिल्हाधिकारी श्री लक्ष्मीकांत कुट्टीकर, माजी आमदार नरहरी हळदणकर, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच आणि स्वातत्र्य सैनिकांनी स्मारकावर पुष्पांजली वाहिली.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/

Skip to content