डिचोली येथे प्रजासत्ताक दिवस साजरा
२६ जानेवारी २०२६
डिचोली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोली तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. डॉ. शेट्ये यांनी स्वयंपूर्ण गोवा २०३७ चे स्वप्न साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व प्रतिपादले आणि तरुणांना एक चांगले भविष्य घडवण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी आश्वासन दिले की डिचोली बस स्टँडचे उद्घाटन पुढील प्रजासत्ताक दिनी केले जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.
मयेचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी बोलताना नागरिकांना स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचे आणि देशाची ओळख आणि अभिमान जपण्यासाठी सतत काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्री सुंदर नाईक, श्री महेश सावंत, श्रीमती कुंदा मांद्रेकर आणि श्री पद्माकर मलिक उपस्थित होते. तसेच उपजिल्हाधिकारी श्री शुभम नाईक, मामलेदार श्री शैलेंद्र देसाई व इतर मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/

