Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

गोवा विध्यापिठाकडून प्रोजेक्ट स्टाफ पदासाठी अर्ज

२३ जानेवारी २०२६

गोवा विध्यापिठाने गोवा राज्य रिसर्च फांऊडेशन पुरस्कृत डिजीटल एम्पावरमेंट ट्रान्सफोरमिंग फायनान्सियल इंडेपेंडन्स फोर गोवा सिनियर सिटीजन्स या विषयावरील प्रकल्पावर गोवा विध्यापिठाच्या गोवा बिजीनेस विभागात काम करण्यास एका प्रोजेक्ट स्टाफ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

प्रकल्पाचा कार्यकाळ ३ वर्षे आहे आणि दरमहा एकत्रित २० हजार रूपये मानधन देण्यात येईल. उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त असू नये. उमेदवाराकडे कमीत कमी ५५ टक्के गुणासह वाणिज्य, आर्तिक सेवा, व्यवस्थापन विषयात मास्टर पदवी पात्रता असावी.

२८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता गोवा बिजीनेस स्कुल विभाग, गोवा विध्यापिठ येथे होईल. उमेदवारांनी आर्थिक सेवा विभाग प्रमुख डॉ पौर्णिमा एस धुमे यांच्या पत्त्यावर अर्ज लिहावा आणि गोवा बिजीनेस स्कुलाच्या कार्यालयात आवश्यक दाखले, गूण पत्रिकेच्या स्वता प्रमाणित केलेल्या प्रतीसह सादर करावे. उमेदवारांनी मुळ दाखले सोबत आणावे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/५५

Skip to content