२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सोहळा
१९ जानेवारी २०२६
२६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येणार आहे. राज्य पातळीवरील प्रजासत्ताक दिन सोहळा सकाळी ८.१५ वाजता ताळगांव पठारावरील गोवा विद्यापिठाच्या मैदानावर होणार आहे. राज्यपाल श्री. पुसापती अशोक गजपती राजू यावेळी राष्ट्रीय तिरंगा फडकवतील आणि मानवंदना देतील आणि त्यानंतर गोव्यातील लोकांना उद्देशून भाषण करतील.
कार्यक्रमाच्या ठिकाणी राज्यपालांचे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव डॉ व्ही कांदावेलू, आयएएस, पोलीस महासंचालक, गोवा विभागाचे ध्वजाधिकारी त्यांचे स्वागत करतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/४१

