२० जानेवारीपासून लोकोत्सव
१९ जानेवारी २०२६
कला आणि संस्कृती संचालनालयाने २० ते २९ जानेवारी २०२६ पर्यंत पणजीतील कला अकादमी कॅम्पसमधील दर्या संगम येथे २५ वा लोकोत्सव २०२६ – लोककला, हस्तकला आणि पाककृतींचा राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव आयोजित केला आहे.
मुख्यमंत्री २० जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री, कला आणि संस्कृती मंत्री आणि कला आणि संस्कृती सचिव यांच्या उपस्थितीत लोकोत्सवाचे उद्घाटन करतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/४०

