निमसुलाईड औषधावर बंदी
१३ जानेवारी २०२६
केंद्र सरकारने १०० मिलीग्रामपेक्षा जास्त निमेसुलाइड असलेल्या सर्व तोंडी फॉर्म्युलेशन औषधाचे उत्पादन, विक्री किंवा वितरण करण्यास औषध आणइ कॉस्मेटिक्स कायदा १९४० खाली बंदी आणली आहे. अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने दिली आहे. निमेसुलाईड औषधाचा वापर मानवांसाठी धोकादायक ठरू शकतो आणि या औषधासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत. औशध तांत्रिक मंडळाच्या शिफारशीनुसार ही बंदी घातली आहे.
वरील बाबी लक्षात घेता, सर्व औषध विक्रेते, उत्पादक, आरोग्य सेवा संचालनालयाच्या अंतर्गत सरकारी रुग्णालये/जिल्हा रुग्णालये/यूएचसी/सीएचसी/पीएचसी/दवाखाने, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, गोवा नर्सिंग होम/रुग्णालये, गोवा वैद्यकीय परिषद/आयएमए तसेच राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना निमेसुलाइड औषधांची विक्री आणि वापर बंद करावा. विक्रेत्यांकडे निमेसुलाईड औषधांचा स्टॉक असल्यास तो उत्पादकांना परत करावा असे अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने कळविले आहे. या औषधाची अधिसूचना अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाच्या वेबसाइट www.dfda.goa.gov.in वर अपलोड करण्यात आली आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३१

