२० जानेवारी रोजी मतदार यादी निरीक्षकांची दुसरी भेट
१२ जानेवारी २०२६
मतदार यादी निरीक्षक सर्वसामान्य लोकांचे कोणतेही दावे/प्रस्न असल्यास ते स्वीकारण्यासाठी २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषदगृहात उपलब्ध असतील.
नवी दिल्लीतील भारतीय निवडणूक आयोगाने महसूल सचिव श्री. संदिप जॅकीस यांची गोवा राज्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. १ जानेवारी २०२६ ही पात्रता तारीख म्हणून सध्याच्या मतदार यादीची विशेष सारांश पुनरावृत्ती चालू आहे.
मतदार यादी निरीक्षक सर्वसामान्य लोकांचे कोणतेही दावे/प्रस्न असल्यास ते स्वीकारण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषदगृहात उपलब्ध असेल. तसेच सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक १०२, दुसरा मजला, सचिवालय, पर्वरी, बार्देश-गोवा, ४०३५२१ येथे त्यांच्या कार्यालयांत संपर्क साधू शकतात किंवा त्यांच्याशी फोन क्रं. ०८३२-२४१९४११, २४१९६२० वर संपर्क करू शकतात.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/२४

