Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

२१ ते २३ जानेवारी पर्यंत लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन यावरील भारत- आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ९ जानेवारी २०२६

भारतीय निवडणूक आयोगातर्फे २१ ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारत आंतरराष्टीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्था परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन भारतीय निवडणूक आयोगाखाली भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेने केले आहे.

या परिषदेला निवडणूक व्यवस्थापन संस्थेचे जगभरातील सुमारे १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, भारतातील परदेशी मिशन आणि निवडणूक क्षेत्रातील शैक्षणिक आणि सराव करणारे तज्ञ उपस्थित राहतील. ही परिषद भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांनी मांडलेल्या अजेंड्याला पुढे नेईल. जो “समावेशक, शांत, लवचिक आणि शाश्वत जगासाठी लोकशाही” या संकल्पनेवर आधारित आहे.

भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक श्री राकेश वर्मा

वर्मा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी २०२६ च्या लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील भारत आंतरराष्ट्रीय परिषदेची व्यापक रूपरेषा मांडली. त्यांनी सांगितले की ही परिषद निवडणूक व्यवस्थापन संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करील.

ज्यामुळे समकालीन आव्हानांची सामायिक समज विकसित होईल, सर्वोत्तम पद्धती आणि नवोपक्रमांची देवाणघेवाण होईल आणि उपायांची सह-निर्मिती होईल. भाषणानंतर आयआयसीडीईएम २०२६ च्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले.

तीन दिवसांच्या या परिषदेदरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह सहभागी ईएमबीजच्या प्रमुखांसह आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसोबत ४० हून अधिक द्विपक्षीय बैठका घेतील.

या परिषदेत ४ आयआयटी, ६ आयआयएम, १२ एनएलयू आणि आयआयएमसी यासारख्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांचा सहभाग असेल, ज्यामध्ये राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या सीईओंच्या नेतृत्वाखाली ३६ विषयगत गट आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ञ चर्चासत्रात सहभागी होतील.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१८

Skip to content