मडगाव येथे गोवा मुक्ती दिन साजरा
१९ डिसेंबर २०२५
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दिगंबर कामत यांनी मडगाव येथील माथान्ही साल्ढाना प्रशासकीय संकुलात ६५ व्या गोवा मुक्ती दिनी राष्ट्रीय तिरंगा फडकविला.
मंत्री श्री कामत यांचे आगमन झाल्यावर जिल्हा दंडाधिकारी श्रीमती एग्ना क्लींटस, आयएएस आणि पोलिस अधिक्षक श्री टिकम सिंग वर्मा, आयपीएस यांनी त्यांचे स्वागत केले आणि पोलिसांच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली.
नंतर श्री कामत यांनी पोलीस निरीक्षक श्री सूरज सामंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा पोलिसांच्या पथक आणि सरकारी हायस्कूल, वाल्किणी सांगे, पीएम श्री नवोदय विद्यालय काणकोण, सरकारी हायस्कूल आंबावली केपे, सेंट अँथनी हायस्कूल, गालजीबाग, होली रोझरी कॉन्व्हेंट हायस्कूल नुवे आणि अवर लेडी ऑफ हेल्थ हायस्कूल कुंकळी येथील होमगार्ड्स आणि विद्यार्थ्यांच्या मार्चपास्टला सलामी दिली. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार आलेक्सियो रेजिनाल्डो लॉरेन्स, अतिरिक्त जिल्हाधिकारी, श्री श्रीनेट कोतवाले, श्री रमेश गावकर, माजी खासदार श्री एदुआर्द फालेरो, वरिष्ठ सरकारी अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
श्री अनिल पै यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८६६

