अमोणा येथे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू ३ डिसेंबर २०२५
वीज खात्याकडून आंबेशिवाडा आमोणा येथे २०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी पिंपळवाडा ते आंबेशिवाडा रस्त्यालगत भूमिगत केबल टाकण्याचे काम हाती घेतले जाईल.
हे काम सुलभ करण्यासाठी २ डिसेंबर २०२५ पासून नियंत्रित खोदकाम आणि खंदक खोदण्याचे काम सुरू होईल. या कालावधीत सार्वजनिक सुरक्षितता आणि प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक वळविणे आणि तात्पुरते निर्बंध लागू केले जातील.
लोकांनी, पादचारी आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी कामाच्या ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कामगारांना सहकार्य करावे ही विनंती.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८३८

