दिव्यांग श्रेणींतील राज्य पुरस्कारासाठी अर्ज
१४ नोव्हेंबर २०२५
दिव्यांग सक्षमीकरण संचालनालयाने दिव्यांग श्रेणीत उत्कृष्ठ मालक (एक पुरस्कार), उत्कृष्ठ बिगर सरकारी संस्था (एक पुरस्कार) आणि उत्कृष्ठ कर्मचारी (चार पुरस्कार) राज्य पुरस्कारासाठी दिव्यांग मालक, बिगर सरकारी संस्थां आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविले आहेत.
रोख ५०,०००/- रूपये, प्रशस्तीपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.
विहित नमुन्यातील अर्ज दिव्यांग सक्षमीकरण संचालनालय येथे मोफत उपलब्ध आहेत. पूर्ण भरलेले अर्ज स्वता प्रमाणित केलेल्या आवश्यक दाखल्यांच्या प्रतीसह २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दिव्यांग सक्षमीकरण संचालनालयांत सादर करावे. हे पुरस्कार १९ डिसेंबर २०२५ रोजी गोवा मुक्ती दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्याहस्ते वितरीत करण्यात येतील.
अर्ज नमुन्याच्या सॉफ्ट कॉपी मिळविण्यासाठी, अर्जदाराने dir-depwd@goa.gov.in या ईमेल पत्त्यावरून मिळवावी .
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८१७

