महिला सक्षमीकरणासाठी वीजमंत्र्यांहस्ते शिलाई यंत्रांचे वाटप
११ नोव्हेंबर २०२५
वीज मंत्री श्री सुदिन ढवळीकर यांनी वाडी तळावली येथील हनुमान मंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थिती लावली. हा कार्यक्रम कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराद्वारे स्थानिक महिलांना सक्षम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम करतो.
स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम उपक्रमांतर्गत, मुख्यमंत्री कौशल्य पथ योजना, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय अंतर्गत यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतलेल्या वाडी तळावलीमधील ३३ महिलांना माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत वीज मंत्री श्री सुदिन ढवळीकर आणि विश्वस्त मिथिल ढवळीकर यांच्याहस्ते प्रमाणपत्रे आणि शिलाई मशीन वितरित करण्यात आल्या. स्वयंपूर्ण मित्र श्री साईराज फडते, सरपंच, उपसरपंच आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत उपक्रमाबद्दल माहिती दिली.
स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाच्या प्रसाराला सहकार्य देण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाला १० शिलाई मशीन दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ फोंडाचे सदस्य – श्री लुईस गोम्स, श्री आशुतोष खांडेकर, श्री प्रवीण नाईक यांचाही सत्कार करण्यात आला.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८०७

