भाडेकरूंची माहिती देण्याचे आदेश
१ नोव्हेंबर २०२५
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे उत्तर गोव्यातील सर्व हॉटेल्स, लॉजिंग आणि बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट निवास, तात्पुरती निवासी व्यवस्था करणाऱ्या घर मालकांना, धार्मिक संस्थाना आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी ग्राहकांकडून मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यासारख्या ओळखपत्रांची मागणी करावी. ओळख पटविल्याशिवाय ग्राहकांना आपल्या हॉटेलात किंवा घरांत प्रवेश देऊ नये.
तसेच भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस स्टेशवर द्यावी. मालकांनी आपल्या ग्राहकांची आणि भाडेकरूंची माहिती जतन करून ठेवावी आणि गरज असते तेंव्हा अशी माहिती पोलीस यंत्रणेस उपलब्ध करावी.
हा आदेश ७ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झाला आहे आणि तो ६० दिवसांच्या कालावधीसाठी लागू राहील. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल असे आदेशात पुढे म्हटले आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८०५

