Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

गोवा कोंकणी अकादमीच्या कोंकणी संशोधकांसाठी विविध योजना १२ नोव्हेंबर २०२५

गोवा कोकणी अकादमीने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत ज्यामध्ये लोकगीत संशोधन फेलोशिप (संशोधनासाठी २०,००० रुपये), लोकगीत अभ्यास प्रकल्प/दस्तऐवज आणि संशोधनासाठी ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य, क्लॅरिसा वाज ए मोरेनास कोकणी संशोधन फेलोशिप ३०,००० रुपये अशा योजनांसाठी इच्छुक लेखक आणि संशोधकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनांसाठी अर्ज नमुना गोवा कोकणी अकादमी कार्यालय, ५ वा मजला, गोवा संचार भवन, बीएसएन एल बिल्डिंग, पाटो प्लाझा, पणजी येथे उपलब्ध आहेत.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. अधिक माहितीसाठी ७७७५८९१८५७ वर संपर्क साधावा.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२/८१०

Skip to content