गतिरोधक उभारण्याचे आदेश
१६ ऑक्टोबर २०२५
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पेन्हा-डी-फ्रांका, ग्रामपंचायतीतील राष्ट्रीय महामार्ग-६६ (गौरी पेट्रोल पंपाकडे) जाणाऱ्या रस्त्यावरील विद्युत खांबपासून ०८.५० मीटर अंतरावर गतिरोधक उभारण्याची अधिसूचना दिली आहे.
तसेच कळंगुट, बार्देश येथील डॉल्फिन सर्कल ते बोडकेवाड जंक्शनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी नो पार्किंग विभाग अधिसूचित करण्यात आला आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३८