casibom giriş

२१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतीदिन

१६ ऑक्टोबर २०२५

२१ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ८.०० वाजता राष्ट्रसेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ पोलीस स्मृती दिन पाळण्यात येईल.

दरवर्षी जम्मू आणि काश्मीरमधील हॉट स्प्रिंग्स लडाख येथे मातृभूमीच्या अखंडतेचे रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या दहा शूर पोलीस जवानांच्या बलिदानाचे स्मरण करतात. अक्साई चिन सीमा भागातून भारतीय हद्दीत घुसखोरी करून सशस्त्र चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात हे पोलिस मारले गेले होते.

१९५९ च्या मध्यापासून, चिनी सैन्याने केलेल्या सीमा उल्लंघनामुळे सीमा भागात सुरक्षा दले सक्रीय होत असतानाच अचानक चिनी सैनिकांकडून भारतीय सुरक्षा दलावर हल्ला होतो. तथापि, २१ ऑक्टोबर रोजी, डीसीआयओ, करम सिंग यांच्या नेतृत्वाखालील पोलिस दलावर सशस्त्र चिनी सैनिक आधुनिक शस्त्रांनी आणि हातबॉम हल्ला करतात. परंतु, फक्त रायफलांसह सशस्त्र भारतीय पोलीस जवानांनी शत्रूवर मात करेपर्यंत आपले मैदान सोडले नाही. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला आणि ९ पोलीस जवानाना चिनी सैनिकांनी पकडले.

चिनी सैनिकांकडून भारतीय पोलीस दलावर झालेल्या या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस जवानांप्रती संपूर्ण भारत देशाने शोक व्यक्त केला. मृत्यू आलेल्या पोलीस जवानांचे शव १३ नोव्हेंबर रोजी चिनने भारतीय सैन्यदलाकडे सोपविले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी

८.०० वाजता हॉट स्प्रिंग्स (लडाख) येथे त्या शवांवर अंत्यसंस्कार झाले. या शूर सैनिकांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी देशांत प्रत्येक जिल्हा मुख्यालयात पोलीस दलाचे संचलन झाले.

नंतर ( १९६०) साली देशातील सर्व पोलीस संघटनांच्या प्रमुखांनी समाज आणि देशाची सेवा करताना मृत्यू येणाऱ्या पोलीस जवानांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रधान मंत्र्यांनी नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथे आपले कर्तव्य आणि निस्वार्थ सेवा करताना मृत्यू आलेल्या पोलीस जवानांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या राष्ट्रीय पोलीस स्मारक समर्पित केले.

गोवा पोलीसही गोव्यातील लोकांची निःस्वार्थपणे सेवा करीत आहेत आणि अशी सेवा करताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पोलीस स्मृतीदिनानिमित्त हेड कॉन्स्टेबल स्व. श्री बाळाराम शिंदे

पोलीस उपनिरीक्षक स्व. श्री अभिषेक शेर-अली परवेझ गोम्स, पोलीस कॉन्स्टेबल स्व. श्री शैलेश के गांवकर आणि पोलीस कॉन्स्टेबल श्री विश्वास बी देयकर यांना आदरांजली वाहण्यात येईल.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७३६

Skip to content