casibom giriş

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा

१ ऑक्टोबर २०२५

राज्यपाल श्री. पी अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दसरा ज्याला आपण विजया दशमी म्हणूनही ओळखतो. दसरा हा सण सद्गुणांनी वाईट प्रवृत्तीवर, सत्याने असत्यावर आणि ज्ञानाने अज्ञानावर मिळविलेल्या विजयाचा उत्सव आहे . भगवान श्री रामाने रावणावर आणि देवी दुर्गेचा महिषासुरावर मिळविलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून हा सण साजरा करतो. जीवनात आपण सर्वजण ज्या अंतर्गत आणि बाह्य लढायांना तोंड देतो त्यांचे शक्तिशाली प्रतीक आहे.

हा सण आपल्याला आठवण करून देतो की नकारात्मकतेच्या शक्ती कितीही बलवान असल्या तरी, धैर्याने, नीतिमत्तेने आणि एकतेने त्यांच्यावर मात करता येते. हा सण आपल्याला कर्तव्य पाळण्यास, करुणा आणि आपल्या दैनंदिन कृतीत सचोटीने जगण्यास प्रोत्साहित करतो.

दसऱ्याच्या या आनंददायी प्रसंगी, मी सर्वांना आशा, दयाळूपणा आणि परस्पर आदराने भरलेला अधिक सलोख्याचा आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी काम करण्याचे आवाहन करतो.

हा सण आपण सर्वांना आनंद आणि भरभराट घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७१२

Skip to content