डॉ. टी.बी.कुन्हा पुण्यतिथी
२५ सप्टेंबर २०२५
स्व. टी.बी. कुन्हा यांची उध्या २६ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यतिथी पाळण्यात येणार आहे. सकाळी ११.०० वाजता पणजीतील आझाद मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत स्व. टी.बी. कुन्हा यांच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहतील. तसेच इतर मान्यवर स्मारकावर पुष्पांजली वाहतील. पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात येईल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८८