Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

संग्रहालयांमध्ये समावेश करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांची नावे मागितली

२५ सप्टेंबर २०२५

फर्मागुढी फोंडा येथील आगामी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचा एक भाग म्हणून, गोवा आदिवासी संशोधन संस्था गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या आणि ज्यांच्या नावाची अद्याप नोंद झालेली नाहीत अशा अनुसूचित जमातीच्या व्यक्तींची नावे गोवा आदिवासी संशोधन संस्थेने आमंत्रित केली आहेत.

संस्थेने २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड, दुसरा मजला, दयानंद स्मृती इमारत, स्वामी विवेकानंद रोड, पणजी गोवा यांच्या कार्यालयात पडताळणीसाठी तपशील पाठविण्याचे आवाहन केले आहे.

आदिवासी संशोधन संस्था गोवाने आदिवासींचा वारसा जपण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांच्या बलिदानाचा आदर करण्यासाठी मौल्यवान सूचना मागविल्या आहेत.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८५

Skip to content