मुख्यमंत्र्यांकडून डॉ. टी.बी कुन्हा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली
२६ सप्टेंबर २०२५
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेच्या वतीने गोवा मुक्ती चळवळीचे जनक डॉ त्रिस्तांव ब्रागांझा कुन्हा यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्र्यांनी पणजीतील आझाद मैदानावरील डॉ. टीबी कुन्हा यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात वसाहतवादी राजवटी विरुद्धच्या संघर्षात योगदान दिलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल आणि गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आयुष्यभराच्या वचनबद्धतेबद्दल त्यांना आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्र्यांसोबत वीज मंत्री श्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, शिष्टाचार सचिव श्री संजीव गडकर, आयएएस, सहकार सचिव श्री यतिंद्र मराळकर, आयएएस, आदिवासी कल्याण सचिव श्रीमती चेष्टा यादव, आयएएस, शिक्षण सचिव श्री प्रसाद लोलयेकर, आयएएस, मत्स्योध्योग सचिव श्री प्रसन्ना आचार्य, आयएएस, जिल्हाधिकारी उत्तर गोवा श्री अंकित यादव, आयएएस, गोवा दमण दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास नाईक देसाई यांच्यासह इतर मान्यवरांनीही डॉ टीबी कुन्हा यांना आदरांजली वाहिली.
पोलीस बँडने लास्ट पोस्टची धून आळवून मानवंदना दिली आणि त्यानंतर राष्ट्रगीत वाजविले.
“गोवा राष्ट्रवादाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे ट्रिस्टाओ डी ब्रागांका कुन्हा (१८९१-१९५८) हे गोव्याच्या वसाहतविरोधी चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते, ज्यांना या प्रदेशातील पोर्तुगीज राजवट संपविण्यासाठी पहिले महत्त्वपूर्ण प्रयत्न आयोजित करण्यासाठी ओळखले जाते.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६९५