३० सप्टेंबर रोजी हिंदी सृजनोत्सव
२३ सप्टेंबर २०२५
मिनेझिस ब्रागांझा संस्थेने ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून मिनेझिस ब्रागांझा, संस्थेत हिंदी दिनानिमित्ताने “हिंदी सृजनोत्सवाचे आयोजन केले आहे.
गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेतील विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्यात मोनोअॅक्टिंग, ऑन द स्पॉट कविता लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, रेखाटन आणि देशभक्तीपर गायन स्पर्धा यांचा समावेश आहे. या प्रसंगी गोवा विद्यापीठातून २०२४-२०२५ मध्ये हिंदी भाषेत बीए आणि एमए मध्ये सर्वाधिक गूण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल.
हिंदी साहित्य क्षेत्रातील मुंबईतील प्रसिद्ध साहित्यिक श्रीमती मधु कांकरिया या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. सन्माननीय अतिथी गोव्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्या अध्यक्षा श्रीमती कृष्णी के. वाळके, मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष श्री. दशरथ परब, समन्वयक डॉ. आशा गहलोत आणि मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव श्री. अशोक परब उपस्थित असतील. सर्व साहित्यिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण.
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ९४२१८६८३२२ वर संपर्क साधावा.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७६