कला आणि संस्कृती खात्यातर्फे चित्रकला स्पर्धा
२४ सप्टेंबर २०२५
कला आणि संस्कृती संचालनालयाने पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त सहकार्याने गोव्यात २७ सप्टेंबर २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि व्यावसायिक कलाकारांसाठी चित्रकला, कार्यशाळा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचा विषय ‘विकासित भारत’ असा आहे.
शाळांना १ ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी कार्यालयीन वेळेत कला आणि संस्कृती संचालनालयात ए-३ आकाराच्या ड्रॉइंग शीटवर इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या ५ प्रवेशिका आणि योग्यरित्या भरलेले सहभाग फॉर्म सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम, व्दितीय आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विध्यार्थ्याना अनुक्रमे १०,०००, ५,००० आणि २,५०० रुपये बक्षिसे दिली जातील. तसेच प्रत्येकी १,००० रुपयांची ३ उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.
पदवी आणि व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून डॉ. के.बी. हेडगेवार हायस्कूल, कुजिरा बांबोळी, गोवा येथे आयोजित केली आहे. प्रत्येक महाविद्यालयाने २७ सप्टेंबर २०२५ पूर्वी योग्यरित्या भरलेले फॉर्म सादर करून फक्त ५ विद्यार्थ्यांना नामांकित करावे. ए-३ आकाराचे ड्रॉइंग शीट आणि १२ रंगांचे क्रेयॉन पेस्टल प्रदान केले जाईल, विद्यार्थ्यांनी इतर आवश्यक साहित्य आणावे. प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विध्यार्थ्यांना अनुक्रमे २५,०००/-, १५,०००/- आणि १०,०००/- अशी बक्षिसे दिली जातील.
व्यावसायिक कलाकारांसाठी स्पर्धा २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून संस्कृती भवन, पाटो-पणजी येथे फक्त ललित कला पदवीधारकांसाठी आयोजित केली आहे. कॅनव्हास (२४” X ३०”) आणि रंग दिले जातील. प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे १,००,०००/-, ५०,०००/- आणि २५,०००/- अशी बक्षिसे दिली जातील.
सहभागींनी २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत ७२१८१४६२४६ या वॉट्सएपवर नोंदणी करावी.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८२