हस्तकला, ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळातर्फे सेवा पखवाडा कार्यक्रम
२४ सप्टेंबर २०२५
गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळाने हस्तकला वस्त्रोद्योग आणि कॉयर खात्याच्या सहकार्याने २५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्या ४.०० वाजता कला आणि संस्कृती खात्याच्या संस्कृती भवनात गोव्यातील कारागीर आणि विणकरांचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी सेवा पखवाडा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात चिकण मातीपासून गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांचा सन्मान करण्यात येईल. प्रधानमंत्री विश्वकर्मा कारागिरांना साहित्य, लुम्स आणि कर्ज मंजुरी पत्रे देण्यात येतील.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हस्तकला खात्याचे मंत्री श्री. रवी एस. नाईक, हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार श्री. प्रवीण आर्लेकर, व्यवस्थापकीय संचालक श्री. सगुण वेळीप, श्री. दामोदर एस. मोरजकर आणि इतर उपस्थित राहणार आहेत.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८०