casibom giriş

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात सरकारी नियुक्ती पत्रांचे वितरण

१९ सप्टेंबर २०२५

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोव्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी पुढील दोन वर्षांत गोवा मानव संसाधन विकास महामंडळामार्फत ५,००० तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जाईल तसेच कर्मचारी निवड आयोगाअंतर्गत लवकरच २,५०० नोकर भरती केली जाणार आहे अशी माहिती दिली.

कला अकादमी, पणजी येथे सेवा पखवाडा उपक्रमांतर्गत आयोजित रोजगार मेळाव्याला बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी विविध सरकारी खाते आणि संघटनांमध्ये नव्याने रुजू झालेल्या ९०० हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रे वितरीत केली. माहिती आणि प्रसिद्धी खात्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या “विकसीत भारत” चे उद्दीष्ठ साध्य करण्यासाठी गोवा सरकारने आत्मनिर्भर आणि कुशल मनुष्यबल निर्माण करण्यावर भर दिल्याचे सांगितले. कामातील प्रामाणिकपणा आणि सार्वजनिक सेवेची वचनबद्धता हा राज्य आणि राष्ट्रीय विकासाचा पाया आहे हे सांगून त्यांनी तरुणांना या दृष्टिकोनाचे समर्थन करण्यास प्रोत्साहित केले.

विकसित भारतासाठी पंतप्रधानांच्या नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण यांचे महत्त्व सांगितले.

नवनियुक्त व्यक्तींचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी जरी ते वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करीत असले तरी त्यांचा एकत्रित उद्देश नागरिकांची सेवा करणे असा आहे असे सांगितले.

गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, शिक्षण खाते, ग्रामीण विकास महामंडळ, पर्यावरण आणि हवामान बदल खाते आणि जलस्त्रोत यासारख्या खात्यांमध्ये या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाला जलस्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांनी स्वागतपर भाषण केले. समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई, राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेट तानावडे, मांद्रेचे आमदार श्री जित आरोलकर, डिचोलीचे आमदार श्री चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट, गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि सांता क्रूझचे आमदार श्री रुडोल्फ फर्नांडिस, पणजीचे महापौर श्री रोहित मोन्सेरात, आयुक्त तथा सचिव श्री सरप्रित सिंग गील आयएएस (माहिती आणि प्रसिद्धी), माहिती आणि प्रसिद्धी संचालक श्री दीपक बांदेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोविंद भगत यांनी केले.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६६५

Skip to content