जलस्त्रोत मंत्र्यांहस्ते अभियंता दिनी अभियंत्यांचे अभिनंदन
१६ सप्टेंबर २०२५
जलस्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर यांनी काल पर्वरी येथील सिंचई भवन येथे आयोजित अभियंता दिन समारंभाला उपस्थिती लावली आणि अभियंत्यांचा सत्कार केला.
भारतातील महान अभियंते आणि दरदर्शी श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
यावेळी बोलताना श्री सुभाष शिरोडकर यांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि डॉ. राधाकृष्णन या दोन महान व्यक्तिमत्त्वांची आठवण करून दिली. अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री शिरोडकर यांनी त्यांच्या कामासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचे आवाहन केले. यामध्ये कामाचा प्राधान्यक्रम, भूमिका निश्चित करणे किंवा विशिष्ट उद्दिष्टे निश्चित करणे यांचा मार्गदर्शन तत्वांमध्ये समावेश असला पाहिजे असे ते म्हणाले.
पुढे बोलताना श्री शिरोडकर यांनी श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी आणि राजकीय क्षेत्रात आणि डॉ. राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात देशाच्या विकासात मौल्यवान योगदान दिल्याचे सांगितले.
यावेळी जलस्त्रोत खात्याचे सचिव श्री सरप्रीत सिंग गिल, आयएएस, मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, जलस्त्रोत खात्याचे अतिरिक्त मुख्य अभियंता अंकुश गावकर, प्रमुख वक्ते गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पूर्णानंद सावईकर आणि माजी मुख्य अभियंता श्री प्रमोद बदामी, श्रीमती स्मिता देसाई आणि इतर उपस्थित होते.
सुरवातीस ईआर ज्ञानेश्वर सालेलकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
अभियांत्रिकी क्षेत्रातील समर्पित योगदानाला अभिवादन केल्यानंतर जलस्त्रोत सचिव श्री सरप्रीत सिंग गिल यांनी अभियंते हे जीवनाचा महत्त्वाचा पैलू असल्याचे सांगितले. ते वैज्ञानिक आणि गणितीय तत्त्वे लागू करून प्रकल्प चालीस लावतात. शाश्वत विकासासाठी अभियंत्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे असेही सचिवांनी सांगितले.
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पूर्णानंद सावईकर यांनी हिरव्या आणि शाश्वत भविष्यासाठी निसर्ग आणि शाश्वतता यांचे एकत्रीकरण यावर भाषण दिले. कार्बन फूटप्रिंट कमी करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
साईश लवंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि श्री जेसन मिनेझिस यांनी आभार मानले.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२५/६४९