गट विकास अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
६ सप्टेंबर २०२५
आदिवासी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांनी आदिवासी धरती आबा जनजातिय ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत आदिवासी प्रशासन व्यवस्था मजबूत करणे, स्थानिक संस्थांना सक्षम करणे आणि अनुसूचित जमाती समुदायांना सरकारी योजना आणि सेवांचा पूर्णपणे लाभ घेता येईल याची खात्री करणे या उपक्रमाचा एक भाग म्हणून, गट विकास अधिकाऱ्यांना जिल्हा प्रक्रिया प्रयोगशाळेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानुसार, ८ ते १० सप्टेंबर २०२५ पर्यंत परिषदग्रहात , रूम नंबर ४०७ , चौथा मजला, माथानी सालदाना प्रशासकीय संकुल, मडगाव येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२५/६४०