५ नोव्हेंबर रोजी विठ्ठलापूर सांखळी येथे त्रिपूरारी पौर्णिमा उत्सव
४ नोव्हेंबर २०२५
५ नोव्हेंबर रोजी विठ्ठलापूर सांखळी येथील वाळवंठी नदीकिनारी त्रिपूरारी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. कला आणि संस्कृती संचालनालय, पर्यटन खाते, पर्यटन विकास महामंडळ, माहिती आणि प्रसिध्दी खाते, दिपावली उत्सव समिती आणि श्री विठ्ठल देवस्थान समिती यांच्या सहकार्याने विठ्ठलापूर सांखळी येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येईल.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवानिमत्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. संध्या ७.०० वाजता भगवान श्रीकृष्ण मिरवणूक, नंतर वाळवंटी नदीच्या पात्रात दीपदानाचा कार्यक्रम होईल. ७.३० वाजता श्री पांडुरंग देवस्थानाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १०.३० वाजता श्री विठ्ठल-रखुमाईची पालखी मिरवणूक आणि नंतर पारंपारिक सारंग दिवे आकाशात सोडण्याचा कार्यक्रम होईल. पारंपारिक नौकाविहार स्पर्धा रात्री १०.३० ते मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत होईल. वाळवंटी नदीच्या पात्रात होणारी नौकाविहार स्पर्धा हे या उत्सवाचे खास आकर्षण आहे आणि गोव्यासह शेजारील राज्यातून हजारो भाविक ही स्पर्धा पाहण्यास येतात. नौकाविहार स्पर्धेत पर्यावरणपूरक नौकांचा सहभाग असतो११. रात्री.०० वाजता त्रिपुरासूर वध कार्यक्रम संपन्न होईल.
माहिती आणि प्रसिध्दी खात्याने श्री विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात “गोव्यातील रस्ते आणि महामार्ग” या संकल्पनेवर एक छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले असून ते सर्वसामान्यांसाठी खुले असेल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/ ७८१
