राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा
४ नोव्हेंबर २०२५
राज्यपाल पी अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना आणि विशेषतः शीख बांधवाना गुरु नानक देव जी यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात ” मी गोव्यातील लोकांना, विशेषतः शीख बांधवाना गुरु नानक देव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. “शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांनी प्रेम, समानता, शांतता आणि ईश्वर भक्तीचा संदेश दिला. ईश्वर हा फक्त एक आहे आणि सर्व मानव धर्म, जात किंवा पंथ भेदभावाशिवाय देवासमोर समान आहेत याची शिकवण त्यांनी दिली. एक ईश्वर आणि मानवजातीच्या एकतेचा संदेश जगभरातील पिढ्यांना सतत प्रेरणा देतो.
या उत्सवाच्या प्रसंगी, गोव्यातील सर्व लोकांना गुरु नानक देवजींच्या शाश्वत महत्व असलेल्या शिकवणीकडे स्वता समर्पित होण्याचे मी आवाहन करतो. प्रेम, करुणा आणि दया पसरविण्याचा आणि गरजू आणि पीडितांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आपण समर्पित होऊया असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/ ७८४
