उत्तर आणि दक्षिण गोव्यात विशेष सघन पुनरीक्षण मोहिमेसाठी हेल्प डेस्क
४ नोव्हेंबर २०२५
भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ४ नोव्हेंबर २०२५ पासून विशेष मतदार यादी उजळणीच्या कामास कामास सुरवात झाली आहे. मतदार यादीसंबंधी कोणतेही आक्षेप, मतदार यादीतील नावांचा समावेश आणि वगळणे, दुरुस्त्या आणि इतर संबंधित सेवांबाबत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय आणि विधानसभा मतदारसंघाच्या संबंधित मामलेदार कार्यालयामध्ये मदत डेस्कची सुविधा स्थापन करण्यात आली आहे.
जनतेने आपले प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी खालील क्रमांकावर मदत कक्षाशी संपर्क साधावा. दक्षिण गोवा—दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय मदत कक्ष क्रमांक ८९९९७६७३४१, प्रियोळ, फोंडा, शिरोडा आणि मडकई मतदारसंघ ८७६६५६३७०००, मुरगांव, वास्को, दाबोळी आणि कुठ्ठाळी मतदारसंघांसाठी – ८७९३ ०४३०१४, नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळी आणि वेळ्ळी मतदारसंघांसाठी – ८९९९७६७३४१, केपे आणि कुडचडे मतदारसंघासाठी – ९५८८४२७३३६, सावर्डे मतदारसंघासाठी – ८२६३८२५३३५, सांगे मतदारसंघासाठी – ७८२२०६९०६७ आणि काणकोण मतदारसंघासाठी – ९२७२०५७८६३.
उत्तर गोवा- उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय हेल्प डेस्क क्रमांक- ९२८४५१०३८४, मांद्रे-१- ८२०८६६३०३९, पेडणे-२-९९२३०९३८२२,डिचोली-३- ९१३०८५५८२९, थिवी-४-८०८७७००७२९, म्हापसा-५- ९८२३६९६५०८, शिवोली-६-९६२३१९४५९५ 9623194595,साळगांव-७-.९३७०४२३०७९,कळंगुट-८-८८०५२६४६४२,पर्वरी-९- ९५२७९१२७३२, हळदोणा-१०- ७८२०८५६२४७,पणजी-११- ७९७२९१५९९४,ताळगांव-१२- ९८२२८९००११,सांताक्रुज-१३ ९८९०६१६४५४,सांतआंद्रे-१४- ९१५८२८२७७५, कुंभारजुवा-१५-८३९०००७८९४, मयें-१६- ७०८३०६११५९, सांखळी-१७-७५०७१९२०५५ , पर्ये-१८- ७५०७३८३४९२ , वाळपई-१९-९८३४४४५६८८.
रहिवाशांनी या सुविधेचा लाभ घेऊन मतदार यादीत त्यांची नावे योग्यरित्या नोंदवली आहेत याची खात्री करावी. तसेच पात्रता तारखेला १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपल्या नावाचा मतदार यादीत समावेशासाठी आवश्यक अर्ज भरून सादर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेष मतदार यादी उजळणी मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करम्याचे आवाहन उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/ ७८२
