casibom giriş

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा

१९ ऑक्टोबर २०२५

गोव्याचे राज्यपाल, श्री पुसापती अशोक गजपती राजूयांनी गोव्यातील लोकांना दिवाळीच्या शुभ आणि आनंदी प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, लाखो लोकांच्या हृदयात दिवाळीला एक विशेष स्थान आहे.

दिवाळी सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतिक आहे. दिवाळी सणानिमित्ताने कुटुंबे एकत्र येतात, घरे दिवे आणि कंदीलांनी उजळतात आणि दिवाळीचा सण समाजात मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावाने साजरा करतात.

हा सण केवळ आनंदाचा उत्सव नाही तर आपला सांस्कृतिक वारसा आणि दया, एकता आणि सलोख्याच्या मुल्यांची आठवण करून देणारा सण आहे. गोव्यासारख्या वैविध्यपूर्ण आणि गतीशील राज्यात, दिवाळी सणानिमित्ताने सर्व समाजामधील बंधुता आणि शांततापूर्ण भावना दिसून येते.

या सुंदर प्रकाशोत्सवानिमित्त, मी सर्व लोकांना समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचे आणि गोवा आणि देशासाठी उज्ज्वल, अधिक समावेशक आणिँ शाश्वत भविष्य घडविण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करतो.

मी सर्वाना आनंदी आणि आशिर्वादित दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. दिवाळीचा हा सण सर्वांना शांतता, आणि सुख समृध्दी घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७४४

Skip to content