मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा
१९ ऑक्टोबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना दीपावलीच्या शुभमुहूर्तावर शुभेच्छा देत दिवाळीचा सण सर्वांना सुख, समृद्धी घेऊन येवो अशी प्रार्थना केली आहे.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री सावंत म्हणतात, दीपावलीच्या पवित्र प्रसंगी मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दिवाळी हा एक उत्साहवर्धक उत्सव असून जो अंधारावर प्रकाशाचा आणि वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतिक आहे. या दिवशी लंकेवर रावणाचा वध करून अयोध्येत परतलेल्या भगवान रामाचे स्वागत करण्यासाठी लोकांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली होती.
डॉ. सावंत पुढे म्हणतात, “दिवाळी हा सण समाजात शांतता, बंधुता आणि जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देतो. गोड आठवणी निर्माण करण्याचा आणि दयाळूपणा पसरवण्याचा हा काळ आहे. दिव्यांचे तेज लोकांचे जीवन उजळविते आणि सर्व त्रासदायक शक्तींना पराभूत करण्यासाठी सर्वांना एकत्र आणतो.
हा सण साजरा करताना, आपण राज्याच्या कानाकोपऱ्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवूया. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमावर अधिक भर देऊन ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन मी लोकांना करतो व गोव्याच्या विकासाला हातभार लावण्यास सहकार्य द्यावे.
चला आपण पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करून दिवाळी साजरी करूया आणि उत्सव सुरक्षित व प्रदूषणमुक्त करूया. राज्य आणि गोमंतकीयांच्या उज्ज्वल भविष्याची मी आशा व्यक्त करतो. प्रत्येकाच्या जीवनात दिवाळीचा सण नवीन ऊर्जा आणि आनंद घेऊन येवो. दिवाळीचा प्रकाश लोकांच्या मनाला आणि हृदयाला एकतेच्या भावनेने उजळून टाको असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७४५