casibom giriş

श्री रवी नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोक सभेचे आयोजन

१७ ऑक्टोबर २०२५

गोवा सरकारने १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता कला अकादमीच्या सभागृहात स्वर्गीय श्री रवी नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, गोव्यातील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांसह शोकसभेला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्व. श्री रवी नाईक यांच्या सर्व हितचिंतकांना शोकसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. रवी सीताराम नाईक यांचा जन्म १८ सप्टेंबर १९४६ रोजी गोव्यातील फोंडा येथे झाला. नाईक यांनी १९८० मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर पहिली निवडणूक लढविली, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. १९९१ मध्ये पक्ष सोडल्यानंतर ते १९९४ मध्ये पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.

ते १९८४ पासून गोवा विधानसभेचे सदस्य होते. १९९८ ते १९९९ पर्यंत ते उत्तर गोव्याचे खासदार देखील होते. २००७ च्या निवडणुकीत त्यांनी फोंडा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला. २००२ च्या विधानसभा निवडणुकीत आणि १९८९ च्या निवडणुकीत त्यांनी मडकई मतदार संघातून विजय मिळविला.

२०१७ च्या गोवा विधानसभेत रवी नाईक पुन्हा एकदा निवडून आले. ते गोव्याच्या पाच सदस्यीय काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (सीएलपी) सदस्य होते.

२०२२ च्या राज्य निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून नाईक पुन्हा निवडून आले.

गोवा विधानसभेतील समित्यांचे अध्यक्षपद भूषवण्यासोबतच, ते प्रादेशिक (गोवा) स्तरावर कॅबिनेट मंत्रीही होते. त्यांनी वेगवेगळ्या वेळी कृषी, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा, माहिती आणि प्रसिद्धी, गृह, नगर नियोजन, कार्मिक, सामान्य प्रशासन, दक्षता, वित्त, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि मुद्रण आणि लेखनसामग्री ही खाती सांभाळली.

स्वर्गीय श्री. रवी नाईक हे एक समर्पित आणि दूरदर्शी नेते होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या विविध विकासकामांद्वारे राज्याच्या विकासावर मोठी छाप सोडली आहे. राजकारण आणि सामाजिक जीवनात त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७४२

Skip to content