राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
१७ ऑक्टोबर २०२५
क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने २०२३_ २४ आणि २०२४_२५ वर्षाच्या राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. युवा विकासाच्या क्षेत्रात प्रशसनीय सेवा करणाऱ्या सक्रिय आणि क्रियाशील व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटना, महाविद्यालय, युवा क्लब आणि निम सरकारी संघटनांकडून अर्ज मागविले आहेत.
वयक्तिक पुरस्कारासाठी १५ ते २९ वयोगटातील युवक अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज नमुना, पात्रतेचे नियम व अटी आणि इतर माहिती क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय www.dsya.goa.gov.in या वेबसाइटवर अपलोड केली आहे. इच्छुक युवकांनी ती डाउनलोड करून घेता येते.
पात्र युवक, स्वयंसेवी संस्था आणि इतरांनी पूर्ण भरलेले अर्ज, केलेल्या सेवेचे प्रमाणपत्र आणि दाखल्यासह ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय, काम्पाल पणजी येथे सुपूर्द करावे. अधिक माहितीसाठी एपीइओ श्री पांडुरंग नाईक,मोबाईल क्र.८८३०६८१५८८ किंवा श्रीमती सिंथिया सिक्वेरा मोबाईल क्रमांक ९८२३३९३६५७ यांच्याकडे संपर्क साधावा.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७४०