निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री केल्याबद्दल दंड
१७ ऑक्टोबर २०२५
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मेसर्स पटेल काजू हाऊस, घर क्रमांक ५/१५५, १ उमटा वाडो, कळंगुट, बार्देश यांना एफएसएस (फूड प्रोडक्ट्स स्टँडर्ड्स अँड फूड अॅडिटिव्ह्ज) नियम २०११ नुसार कमी दर्जाचे काजू, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विकल्याबद्दल आणि आवश्यक तपशील न छापल्याबद्दल ५०,०००/- रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७४१